Posts

Image
ही माझी पवनी नगरी ! माझी पवनी नगरी , ही माझी सुंदर पवनी नगरी फार पुरातन आहे ती बुद्ध काळात होती , बुद्धा पूर्वी होती ,बुद्ध नंतर आज सुद्धा आहे ! बुध्दाच्या काळात इथे विहार बांधले गेले ,पवनी च्या महा जनपदाने ते बांधले .नालंदा , तक्षशीला सारखे येथे मोठे विद्यापीठ होते , बहुदा पदमपाणी , पद्मावती असे त्या वेळी नगरीचे नाव होते आणि नगरी च्या नावानेच विश्व विद्यालय होते . माझी नागरी पवनी एक महा जानपद असून बुद्ध पूर्वीच्या गं राज्यातील एक महत्वाचे गण राज्य होते . नागवंशी शिवाचे गण राज्य! पवनी नागरी आज आहे त्या पेक्षा मोठी वसलेली असावी असे वाटते . आजची वाही , बेताला , शेलारी , खापरी डोंगरी , शेळी हा वैनगंगा नदीचा पूर्वेचा पत्ता पुरातन पवनी नगरीत येत असावा . या परिसरात , ताम्र पत्रे , खजिना , जमा , मुर्त्या , स्तूप , विहार , विद्या पिठाचे अवशेष दिसतात . आज असलेला किल्ला व त्यातील भाग मोखाडा मोखाडा आजही सुस्थितीत , आखीव , रेखीव पद्धतीने बसविला दिसतो . आजचे तलाव बाल समुद्र , भाई तलाव , गाटा तलाव , चंडकाई तलाव , कुऱहाडा तलाव सर्व एके काळी सुंदर कमल पुष्पांनी भरलेले असत . हजारो पांढरे , गुला...
Image
पी डी राऊत गुरुजी माझा मोठा भाऊ, माझा पांडुरंग ! पी डी राऊत गुरुजी म्हणजे पांडुरंग डोमाजी राऊत गुरुजी पवनी नगर पालिका शाळेत हाडाचे शिक्षक , नेटिविस्ट डी डी राऊत चा मोठा भाऊ ,नेटिविस्ट राऊत चा पांडुरंग ! नेटिविस्ट डी डी राऊत , जो काही घडला , आज दिसतो आहे तो केवळ पी डी राऊत गुरुजी मुळेच . तेच नेटिविस्ट डी डी राऊत चे पांडुरंग ! विठ्ठल ! डोमाजी राऊत याना दोन पत्नी किसना बाई , दारोमबा बाई .किस्नाबाई च माहेर सिंधपुरी , दारोमबाबाई च माहेर ईटगाव . त्यांची सहा मुले , दोन मुली . सगड्यात मोठा मुलगा गणपत , मग पांडुरंग मग श्रीकांत मग देवाजी , बाबाजी आणि शेवटी दौलत नंतर दोन मुली शशिकला , शेवंता . गणपतराव आधी नागपूर ला मग गावीच पवनी ला टेलर देश १९४७ साली १५ आगस्ट ला स्वतंत्र झाला माझे सर्वात मोठे बंधू गणपत राऊत , नात्यात चुलता नंदराम झोलबा राऊत , मनोहर भांभोरे ते २०-२२ वर्षाचे तरुण पवनी वरून पैदल मार्च करीत दिल्लीला काँग्रेस अधिवेशना साठी नेहरूंना भेटण्या साठी गेले , नेहरूंची भेट घेतली नेहरूंच्या त्यांना धन्यवाद आणि शाबासकी दिली ! पुढे भाम्बोरे चे वडील सीताराम भाम्बोरे आमदार झाले ., पांडुरंग ...